Saturday, December 3, 2022

शून्य

 My dear friend Mugdha Sheth wrote these beautiful words:


‘Some things can be so pure that you don’t need to have them to love them. You love some people not because you want them. You love them because your heart feels nothing else but love for them. They might be out of your reach. Maybe, you can never have them. But you are still happy that they are a part of your life, in whatever small way. Yes, you still pray for that miracle one day. But you are happy even in this “nothing” relationship. Because for you, this “nothing” fills every gaping hole in your soul.’


Mugdha’s write up inspired me. I have never felt such powerful love for anyone, although motherhood showed me glimpse of what it might be. Is this what Meera felt?


मुग्धाचे विचार माझ्या शब्दांत बांधण्याचा हा प्रयत्न


शून्य


ओढ म्हणू की प्रेम म्हणू

लळा म्हणू की भक्ती

बंध नसे हा आसक्तीचा

आणि नसे विरक्ती


आस मला ही तुझी जरी रे

निर्मळ अन् निश्चल

जिंकण्याची तव ईर्षा नाही

ना हारण्याचा सल


तुझ्यामुळे विश्रांतचित्त मी

तवस्मरणेही गीत स्फुरे

मिटले डोळे तुला पाहती

मला तुझेअसणेही पुरे


जगावेगळे नाते आपुले

अमर्याद तरी शून्य खरे

असे भव्य शून्यत्व सख्या 

जे विश्वाला व्यापून उरे!



- मधुराणी 
३-१२-२०२२

Wednesday, August 24, 2022

एक रविवार सकाळ

दर रविवार प्रमाणे ह्या रविवारी सुद्धा योगा क्लास संपवून मी फ्रेश होत होतो. चहा आणि wordle समोर दिसत होते. प्रत्येक रविवारचं हे माझं ठरलेलं रुटीन! सहसा त्यात कधी व्यत्यय येत नाही. मी चहा गॅस वर चढवण्याचा विचारच करत होतो, तेवढ्यात मधूनी backyard मधून मारलेली हाक ऐकली. तिथे गेल्यावर तिने काही सांगायच्या आतच परिस्थितीचा अंदाज आणि 'तो' आवाज लगोलग आले. 

आमच्या backyard मध्ये स्वयंपाक घरातून जायला एक दरवाजा आहे आणि तो उघडल्या उघडल्या डाव्या बाजूला लगेचच एक gutter चा पाइप आहे. backyard मधल्या canopy मधे सुरु होऊन घराच्या भिंतीवर ३ ठिकाणी मारलेल्या खिळ्यांचा आधार घेत हा पाइप खाली जमिनीत थेट drainage मध्ये उघडतो. हा पाइप साधारणतः १० फूट उंच असेल. मधेच एका ठिकाणी तो curved पण आहे. थोडक्यात, पावसाळ्यात canopy वर जमा होणाऱ्या पाण्याचा(च) व्यवस्थित निचरा करणे आणि हे करताना backyard मध्ये कुठेही पाणी गळती होऊ न देणे हे त्या पाइपचं काम. 

तर ह्या पाइपमधून 'ची चू ची चू ची ची", "खटखट", "फटफट" असे काहीसे आवाज येत होते आणि ते ऐकताच मधूनी मला हाक मारली होती. आदल्या दिवशी सकाळी सुद्धा मला हाच आवाज त्याच पाईप मधून आला होता. पण तो फक्त मलाच आल्याकारणानं त्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नव्हतं 🙂 असो !  

पुढच्या काही सेकंदांमध्ये मनात असंख्य विचार येऊन गेले - उंदीर, खार किंवा तत्सम प्राणी इथे पाईपच्या तोंडातून शिरला असणार, काहीतरी उचापत्या करताना अडकला असणार व पाइपच्या रचनेमुळे त्याला बाहेर पडता आलं नसणार. "काय ही कटकट !" म्हणत लगेचच माझ्या मनात handymanला रविवारी contact करणे, त्यासाठी त्याला जास्तीचे पैसे द्यावे लागणे, backyard मध्ये सगळा राडा होणे....  अश्या बऱ्याच गोष्टी येऊन गेल्या. बर, अजून एक दिवस थांबून थोडं आर्थिक नुकसान कमी करता येईल का हा विचारपण मनात येऊन गेला ...पण मग जर तो प्राणी मेला आणि त्याचा वास यायला सुरुवात झाली तर काय करायचं, असं पण वाटायला लागलं. जे काही करायचं ते आजच करावं लागणार हे कळून चुकलं होतं.... मधूचा पण नेमका एक कॉल होता आणि नाईलाजाने तो घ्यायला तिला जावं लागलं. थोडक्यात रविवारच्या सकाळचा बट्याबोळ सुरु झाला होता आणि मी पुरता वैतागलो होतो... 

माझा स्वभाव दोष का गुण मला माहित नाही पण जेव्हा परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाते तेव्हा माझे त्याबद्दलचे दुखः आणि नैराश्य लगेचच कमी व्हायला सुरुवात होते. ह्याच फेजमध्ये कुठेतरी असताना मी screw driver, drilling machine, हातोडा आणि toolbox गोळा करायला सुरवात केली आणि सगळं सामान घेऊन परत backyard मध्ये आलो. सगळा पाईप परत न्याहाळला आणि लक्ष देऊन कुठून आवाज येतोय हे हातानी पाईपवर वरपासून ठोकून बघायला सुरवात केली. पहिली काही मिनिटे काहीच आवाज नाही आला. ४-५ वेळा ठोकून झाल्यावर मी मध्यावर जिथे curved भाग आहे तिथे पोहोचलो. तिथे अजून एकदा ठोकून पहिलं आणि त्याक्षणी 'धाप' असा आवाज आला आणि तो प्राणी खाली (पण पाईपमध्येच) पडल्याचं मी ताडलं. हा पाइप खाली जमिनीत drainage मध्ये जिथे उघडतो त्याच्या किंचित आधी एक खूप छोटं फट वजा भोक आहे. हे सगळं होत असताना त्या भोकातून थोडी धूळसुद्धा बाहेर आलेली मी पहिली. 

एकंदर त्या प्राण्याच्या आवाक्याचा अंदाज यायला सुरवात झाली होती. हा प्राणी साधारणतः जमिनी पासून २-३ फुट उडी मारून जिथे curved भाग आहे तिथपर्यंत पोहचू शकत असावा पण त्याच्या पुढची झेप, जी साधारणतः ७-८ फुट आहे ती मात्र त्याला काही जमत नसावी असा कयास मी बांधला. जर हा curved भाग, जो खालच्या (२-३ फुटी ) आणि वरच्या (७-८ फुटी) पाईप्सना जोडतो, तो काढला तर खालच्या पाईपच्या उघड्या तोंडापर्यंत उडी मारून हा प्राणी बाहेर पडू शकेल असं मला वाटलं. दुर्देवानं माझ्याकडे त्या curved भागाच्या खिळ्यांसाठीचा compatible screw driver नव्हता. पण drill machine मध्ये त्या खिळ्यासाठीचे bit होते. मी लगेच ते लावले आणि unscrew करायला सुरवात केली... काही सेकंद झाली आणि जोरात 'ची चू ची चू ची ची चू ची चू" आवाज यायला सुरवात झाली. मी दचकलो आणि थांबलो... तो प्राणी तर १०१ % खाली होता आणि त्याला drill bit लागून इजा होणं केवळ अशक्य होतं.. काय झाले असावे हा विचार करताना अजून १-२ दा माझ्याकडून drill फिरवलं गेलं. त्या प्राण्याचा आवाज आणखीनच वाढला आणि माझी ट्यूब एकदम पेटली. 

पोकळ पाईप मध्ये drill फिरून घुमून जो मोठा आवाज झाला होता त्या आवाजामुळे तो प्राणी चांगलाच घाबरला होता. कारण drill फिरायचं थांबल्यानंतर त्याचा 'ची चू ची चू ची ची चू ची चू" हा आवाज पण थांबत होता. हे कळलं आणि मला खूपच वाईट वाटलं. तो प्राणी जणू काही माझ्याशी बोलतोय आणि मला "please थांब" असं सांगतोय असं मला वाटलं. मी drill पहिल्यांदा बाजुला ठेऊन दिलं. २ दिवस पाईपमध्ये अडकून पडलेल्या आणि उपोषणामुळे किंवा गुदमरल्यामुळे कधीही जीव जाऊ शकणाऱ्या ह्या प्राण्याची मला आता खूपच दया आली. आज हे लिहिताना असं वाटतं की कदाचित ह्याच क्षणी त्या माझ्या रविवारच्या वैतागाची जागा त्या प्राण्याला वाचवण्याचा ईर्षेने आणि हट्टाने घेतली असावी... 

drill शिवाय त्या मधल्या भागाचे screws कसे काढायचे हे काही केल्या कळेना.. थोडा विचार केल्यावर मी घरातली सांडशी घेऊन आलो. ती थोडी पकड घेत होती पण लगेच निसटत पण होती. थोडा अजून प्रयत्न केल्यावर screw थोडा हलला. माझा confidence वाढला आणि ३-४ मिनिटात तो screw निघाला. curved भाग जरा सैल पडल्यावर मी तो हलवून वेगळा काढून घेतला आणि खालचा पाईप थोडा आडवा करून तो प्राणी त्या खालच्या पाईपच्या opening मधून बाहेर यायची वाट बघायला लागलो. तोपर्यंत रावी मला join झाली होती. तिला हे सगळं काय चाललं आहे , का चाललं आहे हे सांगितलं. तिच्या सगळ्या प्रश्नांची (जे आजकाल खूप वाढलेत 🙂) उत्तरं दिली. हे सगळं चालू असताना माझं सगळं लक्ष्य त्या पाईपच्या तोंडाकडे कडे होतं. ५-६ मिनिटं उलटून गेली होती पण काहीच हालचाल नव्हती.. आवाज पण पूर्णपणे थांबला होता. मला राहवेना. 

मी खालचा पाईप पण काढायचं ठरवलं. मला वाटत होतं, की तो प्राणी खालच्या पाईपच्या तळाशी आहे आणि जर तो पाईप पण मी काढला आणि पटकन बाजूला झालो तर एखादवेळेस तो प्राणी सुटू शकेल. एकच screw होता. सुदैवानी त्याचा screw driver माझ्याकडे होता आणि तो screw पटकन निघालाही. मी खालचा पाईप उचकटला आणि सराईतपणे बाजूला पळालो आणि उभा राहिलो. पण पुन्हा तेच. त्या प्राण्याचा काहीच पत्ता नाही. ३-४ मिनिटं उलटून गेली होती पण काहीच हालचाल नव्हती. तेवढ्यात 'खुड खुड ..' असा खूप सौम्य आवाज आला आणि थांबला. ह्या आवाजामुळे कळलं की पाईप सोडून हा प्राणी आता drainage कडे पळाला होता ... माझ्या मते जसजसे एक-एक पाईप निघत होते तसतसा हा प्राणी घाबरून drainage च्या दिशेने पळत होता. 

तसं बघायला गेलं तर हे सगळं तसंच सोडून, "जाईल हा प्राणी त्याचा त्याचा" असा म्हणून मी आत घरात जाऊ शकलो असतो. drainage चं तोंड उघडं होतं. पाईप पण बाजूला वेगळे काढून ठेवले होते. कोणी नाहीये अशी खात्री करून हे प्राणी महाशय आरामात सटकले असते. पण हे महाशय सटकले आहेत की नाही ह्याची खात्री मला कशी होणार !? मी तिथेच आता काय करायचं ह्याचा विचार करत घुटमळत बसलो ... drainag मला पूर्ण दिसत नव्हतं. फक्त तोंडच दिसत होतं. drainage आत मध्ये किती खोल आहे आणि आत किती जागा असेल ह्याचा काहीच अंदाज येत नव्हता. अर्थात तो प्राणी त्या drainage मध्ये कुठे असेल ह्याचा पण अंदाज येत नव्हता. मी तिथेच पडलेल्या एका डाळिंबाच्या फांदीनं आत २-३ वेळा poke करून पहिलं. काहीच उपयोग झाला नाही. आवाज पूर्णपणे थांबला होता. हा प्राणी drainage मधूनच परस्पर पळून गेला की काय असा पण विचार मनात आला. पण तसं असतं तर तो हे कधीच करू शकला असता. त्यासाठी २ दिवस थांबायची काय गरज !.. तेवढ्यात मला ह्या drainage मध्ये पाणी सोडायची कल्पना सुचली.. पाण्याचा पाईप नळाला लावला आणि हळूहळू पाणी आत drainage मध्ये सोडायला सुरवात केली. काही सेकंदातच मला 'खळ खळ खळ' असा पाण्याच्या प्रवाहाचा आवाज यायला लागला.. म्हणजे पाणी व्यवस्थित ड्रेन होत होतं आणि कशामुळेही अडत नव्हतं.. 

एक १५-२० सेकंद झाली असतील, मी त्या drainage च्या तोंडाकडे शून्यात नजर लावल्यासारखं बघत बसलो होतो. रावी पण काही होतंय का हे बघत बसली होती.. आणि तेवढ्यात माझ्या छातीत 'धस्स' झालं... रावी पण हलकं किंचाळली.. आम्हा दोघांनाही एक छोटसं तोंड आणि दोन काळे डोळे बाहेर आलेले दिसले. मग तो प्राणी अजून पुढं सरकत सरकत आमच्या पुढ्यात येऊन उभा राहिला ... ती एक मध्यम आकाराची 'खारुताई ' होती आणि अतिशय भेदरलेली दिसत होती. तिचं सगळं अंग पाण्याने भिजलं होतं आणि अंगावरचे केस उभे राहिले होते. amniotic sac मधुन बाळं बाहेर आल्यावर जशी दिसतात तसा काहीसा भास मला ह्या खारुताई कडे बघून झाला. तिचा पुनर्जन्मच असावा हा कदाचित!!!... थांबली होती ती तिथेच थोडा वेळ, काही सेकंदात भानावर येताच धूम ठोकली तिनं!!

ह्या सगळ्याचा मी गेले ३-४ दिवस विचार करतोय, बऱ्याच गोष्टी मनात येऊन जातायत. ह्या प्रसंगा मध्ये मी कधी, कसा, का वागलो हे नेमकं सांगता येत नाही, लिहिता तर नाहीच नाही.. पण प्रत्येक वेळी ह्याचा विचार करताना थोडं समाधान नक्की वाटतं. 

ह्यामुळेच असेल कदाचित, पण उशिरा मिळालेला चहासुद्धा त्या रविवारी जास्त गोड लागला आणि हो, माझं wordle सुद्धा त्यादिवशी तिसऱ्या attempt मध्ये सुटलं!

कुणाल पाटील 
०८.२४.२०२२

Sunday, January 30, 2022

द्वितीय

संदीप,


आज माझी एवढी मोठी इमेल बघून आश्चर्य वाटलं असेल तुलापण तू नुकताच अमेरिकेला गेलास तेव्हा अशाच भल्या मोठ्या इमेल्स पाठवायचो आपण एकमेकांनाव्हिडिओ कॉल नव्हते आणि साधे कॉल केवढे महागहल्ली सगळं बोलणं व्हिडिओवर होतं त्यामुळे हे कमी झालंयपण अवघड भावना पोचवायलापत्रं सोपी पडतात


अशोकला जाऊन उद्या  महिने होतीलतिकडे येण्याबद्दल तू गेले  महिने सतत मला विचारतोयसमी रोज तुला काय आणि कसं सांगू या विचारात आहेहेत्या प्रश्नाचं थोडं लांबलचक उत्तर


आमच्या जवळजवळ ४० वर्षांच्या सहजीवनात प्रत्येक दिवस मी सुखात होतेअशोकच्या अपघातानंतर सुद्धाअशोक आदर्श नवरा होताअपघातानंतर तोलोकांसाठी पूर्वीचा अशोक राहिला नाहीपण आतून तो अशोकच होतातसाच हसराआनंद शोधणारासमोरच्याला आपलंसं करणाराएवढा मोठा शास्त्रज्ञवगैरे आहे यावर लोकांचा विश्वास बसत नसेजुन्या घरासमोरच्या भाजीवाल्याला त्याने तो माळी आहे असं सांगितलं होतंतो बरेच दिवस याला माळीदादाम्हणत होतासतत माकडचेष्टाविनोदत्याच्या हुशारीचास्टेटसचा कधीही त्यानं बडेजाव केला नाहीमाझ्यापुढे तर कधीच नाहीएक वेगळी व्यक्ती म्हणूनमाझ्या स्वातंत्र्याचा नेहमी आदर केलाकिंबहुना व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे काय हे त्यानेच मला त्याच्या वागण्यातून शिकवलंत्यामुळेच माझामाझ्यासाठीचाविचार मी करू शकते आहेमी त्याला खूप मिस करते आहेमला वाटलं नव्हतं एवढंअशोक काही अचानक किंवा अकाली गेला नाहीमी या दिवसाचीकल्पना आणि तयारी अनेकदा केलेली होतीअगदी मनातलं सांगायचं झालं तर काही दिवस असे होते की मी हे होण्याची वाट बघतिलेली आहेपणएकटेपणाच्या ज्या संकल्पना माझ्या डोक्यात होत्यात्यापेक्षा हे खूप वेगळं आहेदुःख तर आहेचपण एक वेगळीच शांततापण आहे४० वर्षांनंतर भेटायलाआलेल्या मैत्रिणीसारखी ही शांतता


संदीपखूप विचार करून मी इथेच राहण्याचा निर्णय घेतलायअर्थात तुझ्याकडे येऊन माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येणारे असं मला मुळीच वाटत नाहीतूहीत्याच मुशीत घडला आहेसपण तरीही मला सध्या तरी इथेच एकटीनंच राहावंसं वाटतंयतू समजून घेशील.


मी येत राहीन थोड्या दिवसांसाठी अधून मधूनशिवाय व्हिडिओ कॉल्स आहेतच

आई 


संदीपने अधाशासारखी मेल वाचलीपरत परत वाचलीहातातला कॉफीचा मग तसाच होताएकदाही तोंडाला  लावताच कॉफी थंड झाली होतीसंदीपलाआईचा राग आला होता

"असं कसं म्हणते हीशांतता कसली आलीयेहा एवढा मोठा पॅरा का लिहिलाय मधेकाय संबंधशब्द शब्द शब्द.. नाही येणार इकडे वगैरे सगळं ठीकआहेपण हे शांतताएकटेपणा काय आहे?"


पहिला धक्का ओसरल्यावर त्याने पुन्हा एक एक शब्द हळूहळू वाचला. 'तू समजून घेशीलया वाक्यावर तो घुटमळलातटस्थपणे आईचा विचार करायलाकमी पडतोय का आपणती नेहमी 'आईअसतेबाबाची बायको काही लोकांसाठीकधीतरी विजया धर्माधिकारींची बहीणहीकुणी तिचा 'मृदुला कुलकर्णीम्हणून विचार करतं का


त्याच्या डोळ्यासमोरची आईची कॉटनच्या साडीतली मूर्ती अस्पष्ट होऊ लागलीतिची जागा जुन्या फोटोतल्या आईच्या चित्रांनी घेतलीविजू मावशीचा हातधरलेल्या आईचा ब्लॅक अँड व्हाईट फोटोविजू मावशीच्या हातात पहिल्या नंबरची आणि आईच्या हातात उत्तेजनार्थ ट्रॉफी असलेला फोटोलग्नात बाबाच्यामित्रांनी गराडा घातलेला फोटोलग्नातला दोन स्ट्रॉनी एकाच बाटलीतून थम्ब्स-अप पितानाचा फोटोत्याला कडेवर घेऊन  खिदळतानाचा फोटोबाबाच्याकॉन्फरन्सेस मधले तिचे पार्ट्यांमधले फोटोअपघातानंतर 'सायंटिस्ट्स फेव्हरेटकेस-२५११ला घेऊन आलेल्या आईचे जगभरातल्या वेगवेगळ्यादवाखान्यांतलेविद्यापीठांमधले आणि ऑफिसातले फोटोखरंच आईचा एकटीचा एकही फोटो आपल्याला आठवत नाही?


"आई तशी हुशार होतीअकॅडेमिकलीहीपण तिची हुशारी विजू मावशीमुळे झाकोळून गेली नेहमीचआई वयानं आणि गुणांनीही नेहमी नंबर  राहिलीलग्नानंतर तिचं दुसरेपण अधोरेखितच झालंबाबाचं व्यक्तिमत्व असं एवढं झळझळीत होतं की समोरचा दिपून जायचात्याच्यामागे उभी असलेली आई कुणीबघूच शकायचं नाहीपण ती तशीच खंबीरपणे उभी राहिलीतिथेचनंबर २च्या जागीघट्ट


बाबाचा अपघात झाला तेव्हा कोलमडून गेली असती खरंतरकोलमडणं सोपं होतंपण ही अजूनच ताकदीनं उभी राहिलीबाबाच्या मेंदूला दुखापत झाली होतीत्याआधी त्याचा मेंदू हेच त्याचं शस्त्र होतंतोच अधू झालाशरीरानं ठणठणीतपण  मिंटापूर्वीचं काही आठवायचं नाहीएखाद्या बाळाला सांभाळावं तसं तिनंसगळं केलंबाबाचा मेंदू अशा जागी निकामी झाला होताकी त्याची स्मृती गेली असली तरी नेहमीच्या जागाकृतीव्यक्ती लक्षात राहत होत्यापण त्याआपल्या लक्षात आहेतहेच त्याला आठवत नव्हतंमानवी मेंदूचा अभ्यास करण्यासाठी ही एक स्पेशल केस होतीदुर्मिळबाबा रेस्पॉन्डही छान करत होतात्यामुळे जगभरातल्या शास्त्रज्ञांसाठी बाबाचा मेंदू हा एक खजिना झाला होताकेस-२५११ या नावाने बाबा पुन्हा एकदा नावारूपाला आला होताबातम्यामासिकांसाठी मुलाखतीठिकठिकाणी टेस्ट्सस्टडीज.. आई तिच्या साठीतल्या बाळाचं सगळं मनापासून करत होतीपण केस-२५११ ची बायको प्रसिद्धीच्याआड राहिलीतिला प्रसिद्धीचा फार सोस होता असंही नाही खरंपण तिला कधी याचं वाईट वाटलं असेल कासतत कुणाच्या तरी मागे उभं राहण्याचा कंटाळाआला असेल कातिच्या मनात हा सल असेल कासतत नंबर .."


नंबर  नंबर  नंबर .. हा जप संदीपच्या कानात वाजू लागलाअचानक तटकन तो उठला आणि जुना लॅपटॉप स्टोरेजमधून काढून घेऊन आलाआईच्यास्काइपच्या अकॉउंटचा नेहमी गोंधळ होत असेत्याला नेहमी तिच्या  स्काइपचं ट्रबलशूट करावं लागत असेअसावाम्हणून त्याने तिचा पासवर्ड लिहून ठेवलाहोताथोडा वेळ धुंडाळल्यावर त्याला तो सापडलाआईचा पासवर्ड होता 'mrudulaDwitiya!'. एक क्षीणसा अपराधी आवंढा संदीपच्या घशात अडकला


-----------


मृदुला चहाचा कप घेऊन पोर्चमध्ये बसलीहे घर ती एकटी असताना कसं दिसतं हे ती अनुभवून घेत होतीबागेतली झाडंपोर्चमधला झोपाळा, 'अशोक मृदुला कुलकर्णी' - नावाची पाटी.. सगळं नवं असल्यासारखं तिला वाटलंतिनं चहाचा एक घुटका घेतला आणि आल्याचा दरवळ घेत आपसूक डोळे मिटले


फाटक वाजलं तेव्हा तिला भान आलंडिलिव्हरी घेऊन माणूस आला होतासुंदर बुके होताउत्सुकतेने तिने त्यावरची चिठ्ठी उलगडलीत्यावर लिहिलं होतं:


मृदुला - ''द्वितीय!

संदीप 



पूर्वप्रसिद्धी: माझा मराठीचा बोल दिवाळी अंक, 2021