पुण्यात लक्ष्मी रोडवर फिरत असताना हातात एक पत्रक आले. या पत्रकातला मजकूर वाचून हसावं की रडावं ते कळेना. ते जपून ठेवलंय. नुसतं वर्णन करून मजा येणार नाही म्हणून तसंच्या तसं इथे लिहित आहे : D
घरगुती कवितांचे दुकान
आमचे येथे लग्ना-मुंजीसारख्या व इतर घरगुती कार्यक्रमांमध्ये वाचण्यासाठी कविता करून मिळतील.
घरगुती कार्यक्रमांमध्ये प्रसंगानुरूप रचलेल्या कवितांचे वाचन हल्ली अतिशय लोकप्रिय झाले आहे. अशा कविता रचणाऱ्या उत्साही व हौशी मावशी-काकू-आत्यांचे कौतुक तर होतेच; शिवाय आप्त-स्वकीयांमध्ये भावही वधारतो. तुम्हालाही अशा कविता वाचाव्याश्या वाटतात; पण सुचत नाहीत का? काळजी करू नका! आम्हाला संपर्क करा.
आम्ही आजवर अनेक घरगुती कार्यक्रमांसाठी customized कविता करून दिल्या आहेत. लग्न, मुंजी, डोहाळजेवणे, बारशी, सहस्त्रचंद्रदर्शन, वास्तुशांत यासारख्या कवितांमध्ये तर आम्ही पारंगत आहोतच, शिवाय वाढदिवस, get-togethers, नातेवाईकांचे परदेशगमन इत्यादी विशेष कार्यक्रमांचाही आम्हाला अनुभव आहे. आमच्या ग्राहकांमध्ये मुख्यत्वे प्रौढ स्त्रीवर्गाचा समावेश आहे. आमच्या काही लोकप्रिय कविता नमुन्यादाखल खाली देत आहे.
लग्नाची मंगलाष्टके: (इच्छुकांनी कविता customize करण्यासाठी त्रिकोणी कंसात योग्य ती माहिती भरावी.)
आली ही <मुहूर्ताची वेळ> ची घटिका समीप
झाला आनंद सर्वांस अमाप
<वराचे नाव> हा झाला सज्ज सजुनी
झुकवी नजर <वधूचे नाव> लाजुनी
<वराच्या आई-वडिलांची नावे> हे गेले आनंदुनी
<वधूच्या आई-वडिलांची नावे> ना आले गहिवरुनी
शेवटच्या दोन ओळी वर-वधू च्या बाकीच्या नातेवाईकांसाठी repeat कराव्यात. (काका-काकू, मामा-मामी, आत्या-काका इ.) हे नातेवाईक नसल्यास उपलब्धता आणि सोयीप्रमाणे इतर नातेवाईक निवडावेत. मंगलाष्टकांमध्ये नावे आलेल्या नातेवाईकांचे मानपान कमीअधिक झाल्यास ते मनाला लावून घेत नाहीत असा आमचा अनुभव आहे. आम्ही माईकवर मंगलाष्टके म्हणण्याचे मार्गदर्शनही करतो.
मुंजीची मंगलाष्टके: वरील मंगलाष्टकांमध्ये वराच्या ऐवजी बटूचे नाव घालावे. वधूच्या नावाऐवजीही बटूचेच नाव घालावे. मुंजीची मंगलाष्टके तयार!
डोहाळजेवणाच्या प्रसंगीची कविता:
कुणीतरी येणार येणार गं
पाहुणा घरी येणार येणार गं
होणार जे ते कस्सं दिसेल गं
मुलगा असेल तो की मुलगी असेल गं
कोणीही असो, तो किंवा ती
फर्रक तुला सांग पडतो किती.
------ एका प्रसिद्ध चित्रपटगीतावर आधारित कविता.
बारशाच्या प्रसंगीची कविता:
कुणीतरी आलंय आलंय गं
पाहुणा घरी आलाय आलाय गं
झालंय जे ते कस्सं दिसतंय गं
मुलगा आहे तो गं मुलगाच आहे गं
कोणीही असता, तो किंवा ती
फर्रक तुला पडला नसता कधी.
------- शंभर टक्के original कविता.
तर तुमचा नजीकचा कार्यक्रम शोधा आणि त्वरित आम्हाला संपर्क साधा. नातेवाईक व मित्रमंडळींवर छाप पडण्याची संधी सोडू नका!
Dadu...this is just hilarious!!! :D:D pune tithe kay une :P
ReplyDeleteYa jagat konihi kahihi viku shakta...Website templates miltaat tashya kavita templates pan dislya vatta tula. Ready-made stuff kind of kills the creativity, but when you got a deadline coming and a task to do, it never hurts to go readymade.
ReplyDeletehaha .. nice :)
ReplyDeletenasheeb ..
" tumhi busy aslaat tar tumchya lagnaat aamchi doan maanase fere ghetil " itki soy nahi keliye :D
मधुराणी,
ReplyDeleteगमतीदार आहे. बारशाची कविता तर फारच धमाल.
ह्या पत्रकाच्या संपादिका म्हणून तुमचे अभिनंदन.
आपला
प्रवासी
प्रवासी, तुमची प्रतिक्रिया वाचून गहिवरून यायचंच काय ते राहिलं होतं. ;)
ReplyDeleteधन्यवाद!