"ओबामाचे correct आहे" - इति जोशी काकू,
"Global credit crisis" वगैरे - पाटलांची शकू,
"सरकार कुचकामी आहे" - शाळेतला टिंकू,
सांगवत नाही कुणाच्या तोंडून काय येईल ऐकू!
जो तो अन्या-गण्या ओकतोय आपली मतं,
उपदेश करायला हल्ली असावं लागत नाही संत,
सल्ला नावाची एकच गोष्ट होत चालली स्वस्त,
दोन कानांपेक्षा एका तोंडाचा वापर जास्त!
Facebook वर अख्खं population आलंय,
सतत व्यक्त होत राहण्याचं addiction झालंय,
हवा-पाण्यासोबत information चं pollution झालंय,
माझ्या छोट्या मेंदूचं त्यामुळे confusion झालंय!
तुम्ही म्हणाल, "ही काकूबाई फार आहे,
कविता हाही व्यक्त होण्याचा प्रकार आहे."
तुमच्या म्हणण्याला माझाही रुकार आहे,
कुणी ऐको न ऐको, अभिव्यक्ती माझा अधिकार आहे. :)
तात्पर्य, पहाटे अचानक चमत्कार झाला,
विजा कडाडून आकाशवाणीचा आवाज घुमला,
आकाशातून सर्वांना दक्षतेचा हुकूम सुटला,
internet च्या जाळ्याला आणखी एक blog फुटला! :)
khuup avadlay... pudhcha patkan yeu dya!!
ReplyDeleteGood one! Really nice
ReplyDeleteThanks Sneha and Sanket!
ReplyDeleteEk number!!! keep writing ! We want more!! :)
ReplyDeleteThanks Sayle! I hope i keep writing and improving!
ReplyDeletehey nice one! keep it up!
ReplyDeleteThank you Sarika!
ReplyDeleteमधुराणी,
ReplyDeleteमधुवाणीची सुरुवात छान झाली आहे.
शेवटच्या कडव्यात नाट्य खूपच छान रंगले आहे.
लिहीत राहा..
आपला
(वाचक) प्रवासी
धन्यवाद प्रवासी!
ReplyDeleteप्रयत्न करते आहे. चू. भू. द्या. घ्या. :)