माझ्या बिचाऱ्या वाजत-गाजत जन्माला आलेल्या ब्लॉगला दोन पोस्ट्स ची चाटणे देऊन मी जो झोपवला, तो आजतागायत. त्याला या hibernation मधून बाहेर काढण्याची हुक्की मला अधून मधून येत होती, पण कधी सुचत नाही म्हणून, कधी वेळ नाही म्हणून, आणि बहुतांश वेळा निव्वळ आळशीपणामुळे ते राहून जात होतं. दरम्यान ज्या एखाद-दुसऱ्या ओळी, कल्पना सुचल्या, त्या डोक्यातच राहिल्या. कधी grocery च्या यादीच्या कपट्यावर, ऑफिस च्या वहीच्या मागच्या पानावर खरडल्या गेल्या.
By the way, ऑफिस ची वही ही माझी अगदी 'सच्चा दोस्त', 'जिगरी यार' वगैरे आहे. माझ्या आणि तिच्यात one way 'ये हृदयीचे ते हृदयी' होत असतं. त्याला काही कारणे आहेत:
१. ऑफिस मध्ये कुणालाही मराठीचा गंध नाही. त्यामुळे कामाच्या नोट्स आहेत म्हटलं कि झालं. ;)
त्यामुळे या वहीत तुम्हाला बडबडगीते, बालभारतीतल्या कविता, 'दिल तो पागल है' मधली गाणी यांपासून अगदी 'XYZ ची आज सटकलीये' सारखी उक्ती पर्यंत काहीही दिसू शकेल. (अर्थात ही वही तुमच्या हातात कधी पडणार नाही ही गोष्ट वेगळी :P) त्या वहीची मागची पाने भरून भरून पार निम्म्यापर्यंत आली आहेत.
वहीची पाने भरविण्याच्या माझ्या वेळाही एका pattern मध्ये आहेत. code मधला एखादा व्रात्य bug हुलकावण्या देत असतो तेव्हा. कुठेतरी एखादा बदल करत असताना मैलभर दूर असलेला एखादा तिसराच code असहकार पुकारतो तेव्हा. दुसऱ्याच्या code मध्ये बदल करण्यासाठी तो समजून घेत असताना डोकं गरागरा फिरायला लागतं तेव्हा. अशा वेळी, Jerry नी Tom च्या डोक्यात दगड/ bat / pan असलं काहीतरी घातलं, की त्याचे डोळे वाकडे होऊन डोक्याभोवती गोलात तारे चमकू लागतात, तसं आपलं होतंय असं वाटू लागतं. मग 'I dont belong here', 'यासाठीच का केला अट्टाहास' वगैरे विरक्तीचे विचार येऊ लागतात मनात. आणि मग हि माझी ऑफिस मधली सखी येते मदतीला. :D
तर मुद्दा असं की.... काय बरं.. (छे.. विषयांतराचाच विषय झाला. टायटल बदलायला हवं :D ) तर मुद्दा असा की, या माझ्या ब्लॉगबाळाला झोपेतून जागे करण्याचा संकल्प त्याच ऑफिस च्या वहीवर मी सोडते आहे. सगळे यादीचे कपटे, वहीची पाने, जुनी कात्रणे गोळा करून त्याला भरविण्याची इच्छा आहे. त्याला यापुढे जागरणे घडोत अशी आशा :)

२. 'किती थुकरट लिहिलंय'
असं मी म्हणेन एकवेळ, पण ती म्हणत नाही. :)

Vaat pahato. Lihit rahave... :-)
ReplyDeletegood morning bloga :P
ReplyDeletevahicha upyog hotoy.. ti magunach poorna bharel he nakki!!
Bhave tumchyakadun inspiration milat rahavi :)
ReplyDeleteHihi thankoo mintre
ReplyDeleteWah wah...Alashi pana band kar ani ajun lihi madhe ! waiting!
ReplyDeletepune vikhyat lekhike kadun itake chote chote blog??? kahitari tadak fadak lihi... waiting..
ReplyDelete@Saylee ani Pai: lihinaaaar
ReplyDelete