Thursday, October 15, 2020

चल झाली वेळ धरित्री


काही
 दिवसांपूर्वी कॅलिफोर्नियामध्ये प्रचंड वणवे पेटले होतेत्याचा धूर शेकडो मैल लांबवर पसरून वातावरणात भरून राहिला होताविचित्र अनुभव होतादिवसभर अंधारलेला लालसर आसमंतसगळीकडे कोंडून राहिलेला धूरत्यात लागोपाठचे - भूकंपभीषण जीवाणू विषाणू.. सगळं एकाच वेळी चाल करून आलं होतंजगभर निसर्गाचं काही ना काही निराळं सुरू आहेकाहीतरी बिघाड झाल्यासारखंत्या पार्श्वभूमीवरच हे शब्द


चल झाली वेळ धरित्री


अवनी द्विधेत थरथरता

आकाशी जहाल उत्तर 

चल झाली वेळ धरित्री,

विसरे मानवतो नश्वर


तू दिलास जन्म तयाला

पोषवले जपून इथवर

पोटी घे अनंत पापे

तो घाली घाव निरंतर


नासवले निल-ऐश्वर्य 

विसविसले हिरवे लक्तर

तनु राखाडली धुराने

मुख भासे म्लान नि जर्जर


मम ह्रुदय सखे पिळवटते

परि त्याचे ह्रुदयच फत्तर

जरि असे पोटीचा पुत्र

आता संहार बेहत्तर 


चल झाली वेळ धरित्री,

विसरे मानवतो नश्वर


फोटोhttps://www.google.com/amp/s/hoodline.com/amp/2020/09/san-francisco-awakens-to-darkness-as-wildfire-smoke-blankets-city-in-red-twilight

No comments:

Post a Comment