नाळ माझी पोटामध्ये पुन्हा राहू लागली तर?
थंड तिच्या पाण्याने तहान माझी शमेल का?
माझं मन पुन्हा माझ्या शरीरात रमेल का?
पावलांना पुन्हा तसंच गार गार वाटेल का?
माझ्यातली मी मला नव्याने भेटेल का?
लहानपणी ज्याला मोठेपणा म्हणायचो
ज्या ज्या गोष्टींना ‘मोठ्यां’त गणायचो
कृष्णेच्या पात्री त्या पुन्हा एकदा दिसतील
त्यांना बघून माझे डोळे पुन्हा एकदा भिजतील
दिसेल का मग मला माझं खोलवरचं मूळ?
झडेल का मग पुन्हा माझ्या जाणिवांची धूळ?
नव्या माझ्या घरासही घरच्यासारखं वाटेल का?
पाण्यातल्या बिंबात त्याला माझी ओळख पटेल का?
उद्या माझ्या अंगणात कृष्णा वाहू लागली तर?
No comments:
Post a Comment