Saturday, August 1, 2020

लेक


मऊसूत या केसांमधुनी

बाल्य तुझे निसटू बघते

नाही कळत तू कच्चा लिंबू

अजूनकी सगळे कळते?


कधी थकवितो बालहट्ट अन्

आई आई भुणभुणही

कधी ऐकशी सांगितलेले

मोठी होचा आशिषही 


घेशी जर मांडीवर डोके

बोटे की साखरसायी

तेव्हा नकळे माझे मजला

तू आई की मी आई

No comments:

Post a Comment